सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले
श्री क्षेत्र नारायणपुर येथील दतगुरूंचा आशिर्वाद असलेले सद्गुरू नारायण महाराज यांनी भक्तगणांसह देश धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांची बलिदानभुमी वढु -तुळापुर येथील समाधी स्थळास भेट देत दर्शन घेतले . आतील संगमेश्वर मंदिरात दर्शन घेवून भीमा भामा इंदायणी संगमाचे दुरुनच माहात्म्य जाणून घेतले . त्यांनतर संभाजीराजांचे समाधीवर माथा टेकवून मागील भिंतीवरील महाराणी येसूबाईचे फोटोवरील ओळी
' समतावादी शाक्त वारसा , येसू कुशल प्रशासनी -श्री राज्ञी सखी जयती राजते शंभूराज संगिनी '
वाचत हात जोडले . त्यांनंतर सभाधीस्थळ तुळापुरचे ग्रामस्थ संतोष शिवले, हनुमंत शिवले ,ऋषिकेश शिवले, संपत जठार, ऋषिकेश चव्हाण आदींनी समाधी स्थळावर सद्गुरु नारायण महाराजांना संभाजीराजाचे जिवनावरील व अंतकाळीचा 'वढु तुळापुरचा रक्तरंजीत इतिहास ' हे पुस्तक भेट दिले यावेळी तेथे अनेक वर्ष दर गुरुवारी नारायणपुरला दतदर्शनाला जाणारे अनेक भक्तगणांनी धावत येवून नारायण महाराजांचे दर्शन घेतले . तुळापुरचे समाधी स्थळासी नतमस्तक होत ज्ञान भक्ती धर्मपिठाचे नारायण महाराजांनी शौर्य त्याग बलीदान भूमीला लीन होत निरोप घेतला .