रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट याला महत्त्व दिले पाहिजे असे प्रतिपादन कालिकामाता विद्यालयाचे माजी शिक्षक सतिष पाटील सर यांनी केले.वाघाळे तालुका शिरूर येथील कालिका माता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पेरणेफाटा येथील हाँटेल चिंचवन येथे पार पाडला. या स्नेह मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सन २००५ सालच्या इयत्ता दहावीच्या बँचने या मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी विद्यालयाचे माजी शिक्षक संजय मसाले सर , भास्कर वाबळे सर , बाळासाहेब शेळके सर कैलास गिरमकर सर , सोनवणे सर , प्राथमिक शाळेचे माजी शिक्षक दिपक जगताप , सुनीता हिंगे , विद्यालयाचे माजी कर्मचारी गोरक्ष डफळ यांसह या बँचचे एकूण ४७ विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना ऊजाळा देत ज्या शिक्षकांनी आपले जीवन घडवले त्या शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत सर्व उपस्थित शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. विद्यालयासाठी भरीव असे योगदान देण्याचे आश्वासन या वेळी विद्यार्थ्यांनी दिले.
सदर स्नेह संमेलनाचे आयोजन माजी विद्यार्थी अमोल यशवंत , किरण शेळके , हर्षवर्धन बढे , अरुण शेळके यांनी केले होते .