सुनील भंडारे पाटील
हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी यांची एकच बैठक झाली त्यानंतर समीतीचे सदस्य रामदास तुपे,माणिक सुपणार,संजय चव्हाण, चंद्रकांत वारघडे यांचेसह सर्व सदस्यांनी बैठक घेण्याबाबत मा तहसिलदार कोलते यांना विनंती केली परंतु त्यांनी वेळोवेळी कारणे सांगून बैठक घेण्यास नकार दिला सदस्यांनी बैठक घेण्याबाबत पत्रव्यवहार केला परंतु तरीसुद्धा बैठक न घेतल्याने रामदास तुपे व ईतर सदस्य यांनी विभागीय आयुक्त यांचे कडे लेखी तक्रार केली त्यांनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने . जिल्हाधिकारी यांना हवेलीच्या तहसीलदार यांनी कर्तव्यात कसूर केल्याने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे सीस्तभंगाची कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या तसेच ताबडतोब बैठक घेण्यात यावी अशे आदेश दिले आहेत.
तालुका स्तरावर अनेक वेगवेगळ्या शासकीय कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत परंतु त्या फक्त नावापुरत्याच आहेत आम्ही स्वतः भ्रष्टाचार निर्मूलन बाबत काम करत असुनही बैठक घेतली जात नाही ईतर कमिट्यांची तर बैठक होतच नाही त्यामुळे सर्व कमिट्यांचे बैठकीबाबत माहिती घेऊन, चौकशी करून हवेली तहसिलदार तृप्ती कोलते यांचेवर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे सीस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. असे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले,
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले की, नवीन पालकमंत्री यांनी अशासकीय सदस्य नियुक्त्या केल्यानंतर समित्या नव्याने घटित होतात त्यानंतर कारवाई चालू होते,