प्रतापगडावर शिवप्रताप, अफजलखानाचा वध हे स्मारक बनवण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
            अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणजे प्रतापगड गडावरील अफजलखानाचा वध, हे स्मारक उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे,        
शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले राज्य शासनाच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे, आज राज्य शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री या संदर्भात एक महत्त्वाचा आदेश काढला आहे, हा आदेश  म्हणजे प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारले जाणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडण्याचा विडा उचलणाऱ्या अफजलखानाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून आया बहिणींची इज्जत लुटत, लुटमार करत, अनेक मंदिरांमधील मुर्त्या तोडल्या, त्या अफजलखानाचा छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढला, याचा साक्षात देखावा तसेच लाईट आणि साऊंड प्रदर्शनाने इतिहास उजळून निघणार आहे,
          अफजलखानाच्या कबरीचे वीस पंचवीस वर्षांपूर्वीचे स्थिती, तसेच अतिक्रमण काढण्यापूर्वीची स्थिती याची छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी पाहिली आहेत, 1990 पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता, सद्यस्थितीत अतिक्रमण सिद्ध झाल्याने, सर्वोच्च  न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचा आदेश जारी केला, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख तयार करण्यात आली होती, या कारवाईदरम्यान अफजलखानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आलेले आहेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुतेश जयवंशी यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे, याविषयी आणखी माहिती समोर येण्याची महसूल खाते व प्रशासन करीत आहे, शासनाचे या शिवप्रताप व अफजल खान वध स्मारक या दणकेबाज निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे, 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!