लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर (तालुका हवेली) मधील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती च्या पंचक्रोशीतील ग्रामदैवत श्रीमंत_अंबरनाथ मंदिरामध्ये कालाष्टमीनिमित्त उत्साहात साजरी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते.
मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता असे मानले जाते. या वर्षी, कालभैरव जयंती १६ नोव्हेंबर, बुधवारी आहे. या दिवशी भगवान भैरवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत.
बुधवार दिनांक 16/11/2022 रोजी पहाटे ५ वाजता श्रीमंत_अंबरनाथ व माता_जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्ताकाभिषेक अभिषेक करण्यात आला व सकाळी ७ ते ९ या दरम्यान 101 दापत्यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व होमहवन करण्यात आले.ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, काळभैरव श्रीकृष्णाच्या उजव्या डोळ्यातून प्रकट झाले होते, जे आठ आठ भैरवांपैकी एक आहेत. काळभैरव हे रोग, भय, संकट आणि दुःख दूर करणारी देवता आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होतात. अशी लोणी काळभोर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भावना आहे,