सुनील भंडारे पाटील
आळंदी येथे छटपूजेच्या वेळी तसेच दीपोत्सवाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या दिव्यांच्या खाली तेल सांडून तसेच त्या दिव्यांच्या तेलकटवाती या इंद्रायणी घाटावर तश्याच पडून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंद्रायणी दगडी घाटावर तेलकटपणा , निसरडा भाग असल्याने भाविक नागरिक पडून दुखापत होण्याची शक्यता होती,
आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक इंद्रायणीतीरी स्नानासाठी येत असतात, त्या कार्यक्रमामुळे आळंदी दगडी घाटावरील भाग हा तेलकट झाल्यामुळे घसरडेपणा सारखी परिस्थिती होती. इंद्रायणी दगडी घाटावर दुर्घटना घडण्याची शक्यता होती याबाबत आळंदीतील आळंदी जनहित युवा मंच या सोशल मीडिया ग्रुप वरती येरवडा येथीलहमकांत ऊर्फ बाळासाहेब आल्हाट यांनी मत व्यक्त केले होते, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख यांना विनंती करण्यात आली, याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आरिफ शेख यांनी सदर परिस्थिती ची माहिती दिली आणि दक्षता घेण्याची विनंती केली त्याबाबत आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी तात्काळ लक्ष देत आळंदी नगरपालिकेच्या अग्निशामकदल आणि नगरपरिषद कर्मचारी यांना घाटावरती स्वच्छतेचे आदेश दीले ,
अग्निशामक दलाच्या पाण्याच्या पाईप च्या मोठ्या दबावाच्या पाण्याने संपूर्ण घाट आणि तेलकटपणा असलेला दगडी घाट अग्निशामक दलाच्या पाण्याच्या पाईपने स्वच्छ करण्यात आला, पाण्याच्या उच्च दाबाने सदर परिसर स्वच्छ करणेtत येत असल्याचे वृत्त कळताच आळंदी जनहित युवा मंच च्या वतीने आळंदी नगरपरिषद यांचे आभार मानण्यात आलेले आहेत , याबाबात आरीफ शेख आणि जागरूक नागरीक हमकांत आल्हाट यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे