आळंदीत अधिकाऱ्यांच्या विशेष सुचना चे पालन करत चोख अंमलबजावणी.. तोंड पाहून कार्यवाही नाही याबाबत वारकरी भाविक नागरिकात समाधान

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
    आळंदी देवाची कार्तिकी यात्रा 2022 याबाबत प्रशासकीय अधिकारी यांनी विशेष सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या ज्यामुळे वारकरी भाविक यांना आणि नागरिकांची मागणी असलेल्या विशेष सूचना यांचे पालन केले जात आहे याची समाधान नागरीक भाविक व्यक्त करताना दिसून येत आहे,   
आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस यांना माननीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय नियोजन बैठकीमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना बाबत विशेष सूचना अंमलबजावणी करण्याची आदेश दिले होते त्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी तसेच विशेष काळजी घेण्याचे कळविण्यात आले त्यायोग्य आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस वैद्यकीय विभाग यांच्या अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामुळे दहा ते बारा लाखांवर होणारी कार्तिकी यात्रा अशी निर्विघ्न पार पडेल अशी संभावना दिसून येत आहे. प्रशासकीय नियोजन बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सदोष पालन झाल्याने तसेच तोंड बघून कारवाई न करता योग्य कारवाई झाल्याचे समाधान नागरिक भाविक वारकरी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे वारीला विशेष महत्त्व देऊन वारीसाठी असणाऱ्या सर्व उपाययोजना राबवल्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेमार्फत केलेल्या उपाययोजना वारकरी भाविक नागरिकांच्या सोयीच्या असून त्यामुळे ही यात्रा हा संजीवन समाधी सोहळा सुकर होईल यात शंका नाही नागरिकांनी व इतर व्यवसायिक पथारी हातगाडी वाले,छोटे दुकानदार यांनी सहकार्याची भूमिका घेता, यात्रेकरू यांना सोयी सुविधांसाठी अडथळा होउ नये याची विशेष दखल घेण्याची तसेच वारी साठी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यास संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी सोहळा हा निर्वीघ्न आणि उत्साहात पार पडेल अशी आशा प्रशासकीय यंत्रणेतून व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!