लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर:- (तालुका हवेली)
लोणी काळभोर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी पोलीस शिपाई आडके व पोलीस शिपाई धुमाळ हे लोणी काळभोर टाऊन बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर हजर राहुन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रात्री 12.30 च्या सुमारास दि.17 नोव्हेंबर रोजी जनता हॉटेलच्या समोर कवडीपाठ टोलनाका,पुणे या ठिकाणी गस्तीसाठी गेले असता दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून आरडा ओरडा करू नका रात्रीची वेळ आहे.असे समजाऊन सांगत होते.तुम्ही तुमचा घरी जा असे वाक्य बोले असता. पोलिस कर्मचाऱ्यांना मारहान केली. पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.आणि मारून टाकण्याच्या उद्देशाने पोशी धुमाळ यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर रित्या जखमी केले.
पो शि धुमाळ हे विश्वराज हाॅस्पीटल लोणीकाळभोर येथे उपचार घेत असुन सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव (१) विवेक किशोर साळुंखे वय २६ वर्षे रा.साळुंखे वस्ती मांजरी खुर्द पुणे (२) मयुर बबन आंबेकर वय २८ वर्षे रा. सदर असे सांगीतले . सदर आरोपीतां विरोधामध्ये लोणीकाळभोर पो स्टे येथे गु र नं ५८८/२०२२ भादवि कलम ३०७,३५३,३३३,३३२,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि अमित गोरे हे करत आहेत.