गावडेवाडी प्रतिनिधी
मुंबईमधील हिंदू तरुणी "श्रद्धा वालकर" हिचे 35 तुकडे करून तिची अतिशय निर्घृण पणे हत्या करणारा नराधम लव्ह जिहादी आफताब पूनावालाचे विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे, या लव जिहाद्यांना यापुढे कठोरात कठोर शिक्षा होऊन अशा घटना घडू नये यासाठी हिंदू जनजागृती समिती, व रणरागिनी राणी लक्ष्मीबाई संघटना यांच्या वतीने चिंचवड चापेकर चौकात आंदोलन करण्यात आले,
श्रद्धा वालकर हे प्रकरण ताजे असताना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील 19 वर्षीय "निधी " या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे, अशी अनेक घटना आतापर्यंत घडली आहेत, या दोन्ही नराधमांना तात्काळ फासावर लटकावावे, तसेच लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली,
या आंदोलनात विविध समविचारी हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या याप्रसंगी, आता आबला नको तू सबला हो,! चंडी दुर्गा काली हो ! लव्ह जिहादी नराधम आफताब, सुफियानला फाशी द्या ! लव्ह जीहाआदी विरोधी कायदा लागू करा ! अशा घोषणा देण्यात आल्या, हिंदू मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्म परिवर्तन करणे, त्यांच्याशी निकाह करणे याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे, अशा गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत, मुलींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत, आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊन देणार का? त्यामुळे लव्ह जीहाद च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचे रणरागिणीच्या कु, क्रांती पेटकर यांनी सांगितले, त्यापुढे म्हणाल्या राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण पाहता यावर काही टिप्पणी करणार आहे की नाही? असा आमचा प्रश्न आहे बेपत्ता होने मागे काही षडयंत्र नाही ना, यामागे लव्ह जीहादचा प्रकार तर नाही ना, याचीही ग्रह खात्याने चौकशी करावी अशी मागणी देखील या वेळी करण्यात आली,