रांजणगाव गणपती प्रतिनिधी
खंडाळे ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावर खंडाळा माथा, येथील एका हॉटेल जवळ वारक-यांच्या दिंडीत प्रवासी वाहन घुसल्याने एक जण मयत झाला तर अन्य वारकरी जखमी झाले असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी सांगितले.
या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा ही दिंडी पुणे-नगर महामार्गावरुन आळंदी येथे जात असताना बस ड्रायव्हरने त्याच्या ताब्यातील बस न. एम.पी.४१ पी.६६६३ ही बस हयगईने अविचाराने वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवत जात असताना खंडाळा गा,वच्या हद्दीतील पुणे-नगर महामार्गावर घाट उताराला एका हॉटेल जवळ, पालखी सोहळा दिंडी मधील गुलाब मोहदीन शेख वय ५९ वर्षे, रा. गोलेगांव, ता. शिरूर, जि. पुणे. यास धडक बसून अपघात झाला असता अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाले आहेत.तसेच बबन महादेव वाखारे यांच्या डोक्यात किरकोळ दुखापतीस कारणीभूत झाला असल्यामुळे वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी सांगितले.
या बाबत पोलीसांनी शिवकुमार विश्वास (वय ४३ ) धंदा ड्रायव्हर, रा. बंगाली कॉलनी, रामकृष्ण नगर होशंगाबाद मध्यप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले.सदर गुन्हा पोलीस हवालदार अनिल जगताप यांनी दाखल केला असुन तपास पोलीस हवलदार .विजय सरजिने हे करीत आहे.