आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलत असताना खालच्या थरावर टीका केली, त्याबाबत महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलने केली जात आहे,आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या महाद्वारात अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने घेण्यात आले,
यावेळी 50 खोके एकदम ओके घोषणा देत अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनाचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचार करून राजीनामा न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील असे घोषित करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे पाटील माजी नगरसेविका मंगलाताई वेंळकर.. रूपाली पानसरे यांची निषेधाची भाषणे झाली. सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे खेड तालुका उपाध्यक्ष रोहन कुराडे आळंदी शहर राष्ट्रवादीचे सौरभ गव्हाणे माजी नगरसेवक मृदुल भोसले.पुष्पाताई कुऱ्हाडे. राणी रणदिवे भाऊसाहेब कोळेकर.ओम गंगोत्री.शुभम जाधव.संकेत पाटील.निखिल बनसोडे .सुशीला मंजुळे .माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर.महिला वृद्ध युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या महाद्वारात निषेधाचा कार्यक्रम घेण्यात आला,कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन महिलांच्या वतीने करण्यात आले, आळंदी पोलीस स्टेशनला निषेध नोंदवत असल्याच्या बाबत निवेदन देऊन राजीनामाची ही मागणी करण्यात आलेली आहे