सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
कान्हूर मेसाई ता .शिरूर येथे शिरूर तालुकास्तरीय आंतरशालेय मुले व मुलिंचे कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भिमाशंकर स . साखर कारखान्याचे व्हा . चेअरमन प्रदिप वळसे पाटील , जि.प सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सभापती विश्वास आबा कोहकडे, विक्रमविर पै. सुभाष उमाप , अध्यक्ष गंगाधर पुंडे यांचे हस्ते करणेत आले .
यावेळी विद्याधामचे माजी अध्यक्ष भास्कर पुंडे , सदाशिव पुडे , क्रिडा प्रशिक्षक झेंडू पवार ,शरद दुर्गे, सरपंच चंद्रभागा खर्डे , उपसरपंच सोपान पुंडे , माजी सरपंच बंडू पुंडे , दादासो खर्डे , नलिनी खर्डे , सुधिर पुंडे , विद्याधामचे सचिव सुदाम तळोले , संचालक राजेंद्र ननवरे, तानाजी खर्डे , रोहिदास ढगे, संकटमोचक शहाजी दळवी, दिपक तळोले , बाबुराव दळवी , मोहन पुंडे , विजय घोलप, आबिद तांबोळी , संदिप तांबे, पै. भैय्या खर्डे , कारभारी पुंडे , नवनाथ पुंडे , राहुल नाणेकर , प्रा . अशोक शिंदे , भाऊसो तळोले , कुस्ती पंच काळुराम लोखंडे ,
शिरूर केसरी पै.राहूल हरगुडे ,ग्रामस्थ , युवा कार्यकर्ते , शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते .
स्वागत गिताने स्पर्धेला सुरुवात झाली . छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून दिप प्रज्वलन करणेत आले . प्रा . अनिल शिंदे यांनी शाळेच्या कमानीसाठी भिमाशंकर कारखान्यातर्फे निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली , ती प्रदिप वळसे यांनी मान्य केली . यावेळी शरद दुर्गे, विश्वास कोहकडे , स्वातीताई पाचुंदकर , पै. सुभाष उमाप यांनीही
विचार मांडले . मान्यवरांचे हस्ते प्रथम कुस्ती महाराष्ट्र केसरी रघूनाथ पवार यांचे सुपुत्र शिरूर हायस्कूलचे पवन पवार व मांडवगणचे अभिजीत फराटे व अथर्व चव्हाण व साहिल शिंदे यांची कुस्ती लावणेत आली . त्यानंतर ज्ञानेश्वरी खैरे या मुलीची विकास झेंडे या मुलासी कुस्ती झाली . तालुक्यातील ३० हायस्कूलच्या ११० जणांच्या कुस्त्या दि २४ रोजी पार पडल्या त्यांत कान्हूर मेसाई हायस्कूलचे ३ विद्यार्थ्यांनी यश मिळविलेचे प्रा . अनिल शिंदे यांनी सांगून देणगीदारां आभार व्यक्त केले.
स्पर्धेसाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष पै . रामभाऊ सासवडे यांनी मॅटसह ५हजाराची बक्षीसे दिली . यावेळी रामभाऊ सासवडे व शिक्रापुरचे मा . उपसरपंच दता गिलबिले आणि खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविलेल्या शिरूर केसरी शैला बंडोबा धुमाळ हिचा स्वाती पाचुंद कर यांचे हस्ते सत्कार करणेत आला . दुसरे दिवसीचे मुलींचे कुस्त्यांचे उद्घाटन शिरूर केसरी पै. शैला धुमाळ , क्रिडा संघटनाध्यक्ष झेंडू पवार , योगेश भांडवलकर, सौ .खर्डे व विद्याधामच्या शिक्षीकांचे हस्ते करणेत आले . यावेळी सौ बबुताई आनंदा नाणेकर या ९० वर्षीय थोरांचे हस्ते छत्रपतींचे प्रतीमेसमोर श्रीफळ फोडून त्या उभयतांचा फेटा साडी देत आयोजकांनी विशेष सत्कार केला .चव्हाण सरांनी सुत्रसंचलन व युवराज केचे यांनी स्पर्धेचे समालोचन केले . पंच म्हणून काळूराम लोखंडे व सचिन आव्हाळे यांनी काम पाहीले . शालेय युवापिढीला बलशाली बनविणाऱ्या या कुस्तीस्पर्धेत ९२ किलो वजन गटात विद्याधाम प्रशाला शिरूरच्या संस्कार निलेश यलभर तर मुलींच्या ७६ किलो गटात जातेगावचे संभाजी हायस्कूलच्या श्रेया निलेश होळकर हीने बाजी मारली . १४ किलो वजन गटापासून ९२ किलो वजन गटाच्या मुला मुलींच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या . आभार पर्यवेक्षक आंधळे सरांनी मानले