सणसवाडी प्रतिनिधी
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, माजी सभापती सुजाता भाभी पवार, नवनिर्वाचित संचालक ऋषीराज पवार यांच्यासह सर्व नवनियुक्त संचालक मंडळ तसेच शिरूर तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी काल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय अजित दादा पवार यांची भेट घेतली.
माननीय अजित दादा पवार यांनी आमदार अशोकबापू पवार व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले! निवडणुकीतील छत्रीचे चिन्ह अर्थात छत्र्या डोक्यावर धरून पुढे पहारेदारांसारख्या उभ्या पंडीतआप्पा दरेकरांकडे पाहून फोटोतील सुजाताभाभी
सह सारे हसताना दिसत आहेत . अजित दादांचं आमदार अशोक पवारांवर कृपाछत्र आहे हे सर्वज्ञात आहे ,
तसेच सणसवाडी येथील जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पंडितआप्पा दरेकर यांचेही छत्र फोटोमध्ये नव्हे तर ते सावली सारखे आमदार पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे मागे पुढे उभे असतात , हेही पुर्णसत्य आहे .
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार श्री सूर्यकांत काका पलांडे बाळासाहेब नरके ,सदाण्णा पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.