सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास सुधारित आराखडा साठी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र देण्यात आले,
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत, वढु बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी विकासासाठी निधीदेखील जाहीर केला आहे, विकास आराखडा देखील तयार करण्यात आला आहे, समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी राज्यातून तसेच देशातून शंभू भक्त येत असतात, त्यामुळे विकास आराखड्याच्या माध्यमातून ज्वलंत इतिहास जागृत करण्यासाठी प्रशासन व राज्य शासन तसेच ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत,
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा सुधारित आराखडा तयार करून या ठिकाणी तीर्थस्थळा प्रमाणेच विकसित करताना, श्रीमंत शहाजीराजे ते सरदार महादजी शिंदे, मराठा वीरांचे समग्र इतिहासाची माहिती दिली जावी व भित्ती शिल्प उभारण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे पत्र देण्यात आले, समाधी विकास आराखड्याप्रमाणे लवकरच सुरू करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती, व ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकास केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, यावेळी समितीचे कार्यवाहक मिलिंद भाऊ एकबोटे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे यांनी मुख्यमंत्र्यांना शंभू राजांची प्रतिमा भेट दिली,