सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर अवैध रित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगचा सुळसुळाट झाला असून संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे,
राज्यामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा स्टेट हायवे 60 या रस्त्यावर व्यावसायिकांनी आपल्या फायद्यासाठी, असंख्य विनापरवाना होर्डिंग उभारून व्यवसायाला चालना देण्यासाठी, कायद्याचे उल्लंघन केलेले दिसत आहे, या अवैध उभारण्यात आलेल्या होल्डिंगमुळे अनेक अडचणी तयार होत आहेत, वाहन चालकांनी समोरचा रस्ता पाहायचा का? जाहिरातीचे होर्डिंग वरील आकर्षक छायाचित्र पाहायचे, की त्यावरील मजकूर वाचायचा? यामुळे मिळत आहे अपघातांना निमंत्रण, शिवाय काही ठिकाणी अतिक्रमण करून होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत, या होर्डिंग मुळे व्यवसायिकांचा फायदा सोडता अनेक तोटे आहेत, अनेक होर्डिंग जीर्ण अवस्थेत झालेले आहेत, की जे होर्डिंग वादळी पावसामध्ये रस्त्यात पडू शकतात, प्रवाशांचे प्रवासात दुर्लक्ष होते, यामुळे अपघात व कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,
पुणे नगर महामार्गावर वाघोली पासून पुढे, लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, डिग्रज वाडी फाटा, सणसवाडी, शिक्रापूर, मलठण फाटा, रांजणगाव गणपती, न्हावरा फाटा, शिरूर, आदी गावामधील चौकामध्ये, तसेच महामार्ग लगत अवैध होल्डिंगचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे पुणे नगर महामार्गावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंग वर कारवाई होऊन संबंधित खात्याने अवैधरीत्या झालेला होर्डिंग चा सुळसुळाट थांबवा अशी नागरिकांनी विनंती केली आहे,
जाहिरात दार गिरीराज ज्वेलर्स यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, परवानगी बद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, आमची एजन्सी त्यावर काम करत आहे,
होल्डिंग चे मालक संपत (आबा) गाडे यांनी सांगितले की, संबंधित खात्याने नोटीस काढले आहेत त्या संदर्भात फाईल जमा करायची आहे, अद्याप कुठलीही परवानगी नाही,