रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
आज रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील फियाट कंपनीत मैला चेंबर साफ करताना दोन कामगार गुदमरून मृत्यू झाली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिली.
मच्छिंद्र दादाभाऊ काळे ( वय ४२) रा. शिंदोडी ता. शिरुर व सुभाष सुखदेव उघडे ( वय ३४) रा. कुरुंद ता.पारनेर असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत सदर घटना समजताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण बळवंत मांडगे व सहका-यांनी घटना स्थळी धाव घेत घटना स्थळाला भेट देऊन घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली.व दोन ही मृतदेह तपासणी साठी खाजगी रुग्णालयात नेले असता डाँक्टरांनी मृत घोषीत केले. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करित आहेत.
एकंदरीत औद्योगिक वसाहती मधील कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना पाहता कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, रोजगारीच्या पाई कामगारांना आपला जीव गमवावा लागत आहे, असुरक्षित असणाऱ्या सेफ्टी टॅंक मध्ये काम करत असताना कामगारांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे गरजेचे असताना, संबंधितांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीव जात आहेत, अशा बेजबाबदार कंपनी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे,