गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
आंबेगाव, तांदूळवाडीचे रायझिंग महाराष्ट्र चे पत्रकार गणेश जाधव यांचेवर बारामती भिगवण मार्गावर काही अज्ञातांनी गोळीबार केला, त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न तसेच पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने मंचर पोलिसांच्या माध्यमातून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अंकित गोयल यांना एक निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीरराजे पठाण यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे, पोलीस अधिकारी राजेंद्र नलावडे यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी वास्तव मराठीचे संपादक संदीप खळे, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीलम टेमगिरे, समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बर्वे, आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. अतुल साबळे, सचिव विलास भोर, उपाध्यक्ष उत्तम टाव्हरे, कार्याध्यक्ष नितीन थोरात, महिला सदस्य प्रमिला टेमगिरे, नियोजन समितीचे उपाध्यक्ष राजू देवडे, सचिव मिलिंद टेमकर, कार्यकारी समितीचे सहसचिव स्वप्नील जाधव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते तर अनेक पत्रकार बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांवर होणारे हल्ले हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तर अशा हल्ल्यांना चाप बसू शकतो. पत्रकारांना निर्भीडपणे काम करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ सर्वच स्तरांवर प्रयत्न करत आहे. (डॉ. समीरराजे पठाण, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ)
पत्रकार हा शासन, प्रशासन, जनता आणि न्यायपालिका यांमधील दुवा आहे. पत्रकारांना निर्भीडपणे काम करता यावे यासाठी पोलिस प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून चांगल्या पत्रकारांना नेहमी सहकार्य करत आले आहे आणि यापुढेही करीत राहीन. (सतिश होडगर, पोलिस निरीक्षक)