तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कन्या प्रशाला लोणी काळभोरचा द्वितीय क्रमांक

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
          २६ नोव्हेंबर रोजी मुली गटामध्ये तालुका क्रीडा कार्यालयातर्फे झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या  खो-खो स्पर्धेत  लोणी काळभोर कन्या प्रशाला शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला.              वडकी येथे ही स्पर्धा  मोठ्या उत्साहामध्ये झाली. या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोणा महामारी मुळे शाळा, महाविद्यालय बंद होती.लोणी काळभोर कन्या प्रशाला ग्राउंड ची अवस्था देखील दयनीय होती.या वर मात करून  या वेळी विजेतेपद पटकावले. 
      लोणी काळभोर कन्या प्रशाला विद्यालयाने  सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय लोणीकंद विरुद्ध सेमी फायनल लोणी काळभोर दोन गुणांनी कन्या प्रशाला विजयी झाली.सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय लोणीकंद विद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात फायनल मध्ये पवार पब्लिक स्कूल हडपसर विरुद्ध कन्या प्रशाला फायनल द्वितीय क्रमांक मिळाला.
    खो - खो क्रीडा स्पर्धेत. 17वर्ष वयोगट मुली. हवेली तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून कन्याप्रशाला लोणी काळभोरचे नाव तालुक्यात लौकिक केले. यासाठी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका झिंजुरके मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, सेवकवृंद, क्रीडा शिक्षक सूर्यवंशी सर आणि तंत्रस्नेही शिक्षक गोरे सर यांनी वेळोवेळी ऑनलाईन चे काम पूर्ण करून सहकार्य केले .या सर्वांच्या सहकार्यामुळे. संघ विजय होऊ शकला. विजयी संघाचे  पंचक्रोशीत कौतुक होत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!