सुनील भंडारे पाटील
केसनंद (तालुका हवेली) ते वाडे बोल्हाई या 6 किलोमीटरच्या अंतरामधील बऱ्याचश्या भागात प्लॉटिंग व्यवसायिकांनी प्लॉटिंग व्यवसाय खोलला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाहिरातीसाठी बोर्डच बोर्ड लागले आहेत,
संबंधित भागामध्ये महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र बोल्हाई माता मंदिर राज्याचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भाविकांची सतत ये जा असते, वाघोली पासून पुढे केसनंद पास केल्यानंतर डाव्या बाजूने असणारी डोंगररांग त्याचप्रमाणे रस्त्याच्या उजव्या बाजूने लहान मोठ्या टेकड्या माळरान कायम यापूर्वी निसर्ग सौंदर्याने बहरलेले असायचे परंतु प्लॉटिंग व्यवसायिकांमुळे या निसर्ग सौंदर्याला गालबोट लागले आहे,
प्लॉटिंग व्यावसायिक डोंगर रांगेच्या पार पायथ्याला पोहोचले आहेत, तसेच रस्त्याच्या दक्षिण बाजूच्या लहान मोठ्या टेकड्या पोकलेन आणि डंपर च्या साह्याने खाजगी मालकीच्या नावाखाली सपाट झाले आहेत यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, शासनाच्या तुकडा बंदी कायद्याला पूर्णपणे केराची टोपली दाखवत, राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसायिक दिवसा ढवळ्या जाहिरात बाजी, बॅनर, लेआउट, ब्लॉक, त्याचप्रमाणे, भूभागाची अक्षरशा चाळण करताना या भागात दिसत आहे,