शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील एक छोट्याश्या गुनाट या गावातील लोहार समाजाचा एक तरुण, युवकासाठी एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे आणि समजातील गरजू नागरीकांना कायम आपल्या जवळील असलेली माहिती समजावून सांगणारे व्यक्तिमहत्व, समाजसेवेची आवड काही कालावधीत आपल्या समाज कार्यातून आणि पत्रकार क्षेत्रातील त्यांनी टाकलेले पाऊल एक दिवस चांगले आदर्श निर्माण करून सर्व तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरत आहे तसेच राष्ट्रिय मानव अधिकार भारत पुणे जिल्हा सरचिटणीपदाचा कार्यकाल ज्यांनी आपल्या इमानदारीने पार पाडला असे एकनाथ पाराजी थोरात यांना नव्या उमिदिने पुणे प्रभारी मीडिया पदी सर्वानुमते राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांच्या आदेशाने निवड करण्यात आली
या निवडी दरम्यान राष्ट्रीय महासचिव रमेश मामा गणगे, राष्ट्रीय सचिव प्रतीक दास, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष कांबळे, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दीपक खैरे सर, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष दस्तगीर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संभाजी साबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील,शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, शिरूर शहरअध्यक्ष शकीलभाई मनियार,शिरूर तालुका कार्याध्यक्ष हेमंत वायदंडे, जनप्रवास पत्रकार योगेश भाकरे, पुण्य नगरी पत्रकार विजय थोरात या सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच या निवडीबद्दल लोहार युथ फाउंडेशन पुणे व संघर्ष फाउंडेशन पुणे, गुनाट ग्रामस्थ, पदाधिकारी, मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.