ग्रामपंचायत कासारी (ता.शिरूर). जि.पुणे येथे 15वा वित्त आयोग महिला सबलीकरण कार्यक्रम अंतर्गत चार दिवसांचे गोळी पेंड प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते,
सदर प्रशिक्षण "पर्णकुटी"अनाथ महिला व बाल अधार केंद्र राजगुरूनगर व यूनिटी फाउंडेशन पुणे. यांच्या विद्यामाने आयोजीत केले गेले. या प्रशिक्षणात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. वरील प्रशिक्षण अंतर्गत आवसरी बु!टाव्हरेवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथे त्यांच्या गोळी पेंड प्रकल्पास प्रत्यक्ष भेट दिली. प्रकल्प प्रमुख कोंडूभाऊ राक्षे. यांनी लाभार्थीस प्रकल्पा विषयी योग्य मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण उद्घाटन व समारोप प्रसंगी गावचे लोक नियुक्त प्रथम नागरीक सरपंच सुनिताताई सुखदेव भुजबळ, मा ऊपसरपंच गणपतराव काळकुटे, नवनिर्वाचित उपसरपंच रोहीनी दत्तात्रय रासकर. सुखदेव भुजबळ,ग्रामविकास अधिकारी वसंत पवार मुख्याध्यापक दादाभाऊ नळकांडे,उपशिक्षक ज्ञानदेव चव्हाण.गावचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते. प्रशिक्षण,प्रशिक्षक म्हनुन सचिव उपाध्ये रिना मंगेश औटी,मंगेश औटी, हे होते तर संस्था प्रमुख सुर्यकांत रामभाऊ शिवले यांनी प्रस्तावणा व सूत्रसंचालन केले. संस्था समन्वयक वैशालीताई मालकर यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले.