शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त भीमा नदी तीरावर दीपोत्सव करण्यात आला.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरुर) येथे श्री पांडुरंग मंदिरामध्ये दररोज पहाटे काकडा आरतीने परिसर भक्ती रसात नाहून निघत होता. या काकड आरतीची समाप्ती आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये सकाळी झाल्यानंतर सायंकाळी सूर्यास्तानंतर ग्रामस्थांनी नदी काठावरील मंदिरात विधेवत पूजा करून आरती केली व दिवे पेटवून भीमा नदीच्या पाण्यात सोडले. यावेळी पुजारी नामदेव गवारी, विश्वनाथ गवारी, श्याम गवारी, कुंडलिक गवारी, सोमनाथ गवारी, चंद्रकांत गवारी, बबन शिंदे, रायचंद शिंदे, प्रकाश शिंदे, विलास शिंदे, संभाजी शिंदे, अंकुश शेलार, नवनाथ गवारी, सुभाष गवारी, हिरामण गवारी, मोहन गाडे, मछिंद्र गवारी, शिवाजी ढवळे, मंदाबाई गवारी, सीमा गवारी, रुपाली गवारी, सुनीता गवारी, कमल गवारी, शालन गवारी, आण्णा गवारी तसेच काकडा भजनी मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी भीमा नदी काठावर भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर विधिवत पूजा करून दिवे लावले आणि भीमा नदीच्या पाण्यात दिवे सोडले. त्रिपुरा पौर्णिमेची सांगता प्रसाद वाटपाने करण्यात आली,