अप्रतिम बांधकामाचा ब्रिटिश कालीन नमुना कोरेगाव भीमाचा सर सेनापती हंबीरराव मोहिते पूल, पुरातन रेखीव, कमानी, आकर्षक दगडी बांधकाम,
सुनिल भंडारे पाटील
कोरेगाव भीमा( तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर आजही शान मध्ये भीमा नदीवर उभा असलेला सुमारे 111 वर्षांपूर्वीचा दगडी बांधकामातील पूल तहाट मानेने उभा आहे,
आपल्या देशामध्ये, तसेच राज्यामध्ये अनेक ठिकाणी ब्रिटिश कालीन इमारती आपल्याला पाहायला मिळतात, पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी, शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी नदीवर दगडी बांधकामा मधील अतिशय सुंदर अशा कमानीच्या माध्यमातून आज शेकडो वर्षे उलटून देखील, अतिशय चांगल्या कंडीशन मध्ये इमारती व पूल उभे आहेत, आजही चांगल्या अवस्थेत ऊन,वारा,पाऊस, यांचा भडीमार झेलत इमारती चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत,
शिरूर हवेली तालुक्याच्या सीमा रेषेवर भीमा नदीच्या पात्रात उभा असलेला ब्रिटिशकालीन पूल आजही शेकडो वर्षानंतर चांगल्या अवस्थेत उभा आहे, कोरेगाव भिमाच्या बाजूने भीमा नदी पात्रामध्ये उतरल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर असे, रेखीव, कमानी मध्ये दगडी बांधकामात उभे असलेले पुलाचे सुंदर रूप, मनमोहीत करते, एकदा का या नदीपात्रातील पुलाकडे पाहिले की डोळ्यांचे पारणे फीटते, सुमारे 111 वर्षांपूर्वी 1912 मध्ये भीमा नदी ओलांडण्यासाठी ब्रिटिशांनी या पुलाचे बांधकाम केले, आज अनेक वर्षानंतर आपण जर पाहिले तर, दगडी बांधकामामधील दगड आहे त्या ठिकाणी स्थित आहे, एकही दगड सरकलेला नाही, पुराच्या पाण्याचा मोठा दाब सहन करत, बाराही महिने बंधाऱ्याच्या पाण्यात उभा असलेला पूल तहाट मानेने उभा आहे, या पुलावरून रात्रंदिवस लाखो गाड्या कित्येक टन माल घेऊन धावत आहेत, यावरून आपल्याला समजलेच असेल या पुलाचा भक्कमपणा, आजही शेकडो वर्षानंतर फुलाचे रेखीव दगडी बांधकाम पाहण्यासारखे आहे,