सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यामधील काही ग्रामपंचायत निवडणूक येत्या 18 तारखेला होणार असून यामध्ये सर्व उमेदवारांच्या झोप उडली असून, रात्रीचा दिवस करत जोरदार मोर्चेबांधणी चालू आहे, यावेळी 10 ते 15 हजार रुपये मताला भाव मिळेल, रात्रीच्या वेळी वाटप होईल, अशा चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागत आहेत,त्यामुळे पोलीस खाते, निवडणूक प्रशासन नेमके काय पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे,
जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत निवडणूक आहे, सद्यस्थितीत हवेली तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या असून अजून तीन दिवसांनी 18 डिसेंबरला मतदानात मतदार आपला हक्क बजावणार आहेत, त्या अनुषंगाने उमेदवारांकडून रात्रंदिवस जोरदार सर्व बाजूंनी तयारी चालू आहे, सर्वच उमेदवार पोस्टरबाजी, बॅनरबाजी, भोंगे अनाउन्समेंट, प्रत्यक्ष भेट घेऊन, प्रचार जोरदार सुरू आहे, रात्र वैऱ्याची या म्हणीनुसार रात्रीच्या वेळी देखील हालचाली होण्याची शक्यता नागरिकांकडून, ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे, जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न चालू असून या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे, मताला 10 ते 15 हजार रुपये भाव फुटून त्याचे रात्रीच्या वेळी वाटप होते की काय अशा चर्चा सध्या नागरिकांमध्ये चालू आहे, त्यामुळे पोलीस खाते, निवडणूक प्रशासन यांच्यासमोर परिस्थिती हातात ठेवणे एक मोठे आव्हान आहे, त्यांच्यातर्फे नेमकी काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे,