गावडेवाडी प्रतिनिधी
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वरचा हिंगे मळा (घाटी वस्ती)येथील शामकांत नरहरी हिंगे यांच्या मक्याच्या पिकात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. त्या मुळे परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीने धास्तावला आहे. तयामुळे या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेती साठी दररोज दिवसांत विद्युत पुरवठा कमीत कमी सहा तास मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी बोलून व्यक्त केली आहे.रात्री शेतात जाण्यासाठी भीती वाटत असल्याने प्रशासनाने विचार करावा.गुरुवार सकाळी आठ वाजता शामकांत नरहरी हिंगे मक्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी आले असता मका पिकाला पाणी पोहचले किंवा नाही हे पाहण्यासाठी आत गेले असता, आत कसला तरी वास आला म्हणून त्यांनी सरीत पाहिले असता बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळला. गेल्या मंगळवारी मका पिका शेजारील शेताला पाणी भरताना वास आला नव्हता. या एक दोन दिवसात बिबटया मृत झाला असावा अंदाज व्यक्त केला आहे.
वरचा हिंगे मळा येथील डिंभे उजव्या कालव्याच्या जवळ शंभर फुटाजवळ
लगत शामकांत हिंगे यांची मक्याचे पिक आहे. सुमारे सव्वा दोन महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे. मका सुमारे सहा फूट उंच वाढलेली आहे. सहा महिने वयाचा नर जातीचा बिबटया मृत आढळला आहे.या वेळी सरपंच पवन हिले, माजी उपसरपंच सचीन हिंगे, स्वप्निल हिंगे, कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे. गुलाब हिंगे, पोलीस पाटिल माधुरी जाधव, माजी सरपंच किशोर हिंगे यांनी भेट दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ यांच्या मार्गदर्शना खाली प्रदिप कासारे आणि सूर्यकांत कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ येवले यांनी येऊन मृत बिबट्याची आणि परिसराची पाहणी केली.
या परिसरात वारंवार बिबटया दिसत आहे अनेक वेळा प्राण्यावर हल्ला केला आहे. त्या मुळे या भागात पिंजरा लावावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्याना रात्री अपरात्री शेती पिंकाना पाणी द्यावे लागते. त्यात बिबट्याची दहशत त्या मुळे विज वितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करावा आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.