सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्याच्या पूर्व हवेली पट्ट्यातील केसनंद ते वाडेबोल्हाई दरम्यानच्या सहा किलोमीटर अंतरामध्ये प्लॉटिंग व्यवसायिकांचा सुळसुळाट झाला असून, सर्रासपणे तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन केलेले दिसते, पर्याय म्हणून कुलमुखत्यारपत्र ( पावर ऑफ ॲटर्नी ) चा जोरदार दणका चालू आहे, संबंधित सातबाऱ्यावर निघत आहे जुने लिटिगेशन,
पुणे शहर वाघोली पासून जवळ केसनंद गाव ते वाडेबोल्हाई या सहा किलोमीटरच्या अंतरामध्ये राहु रोडच्या दोन्ही बाजूने, तसेच या रोडच्या दक्षिण बाजूला आत मध्ये बरेच अंतर शेती झोन असणारी जमीन शासनाचे सर्व नियम झुगारून राजरोसपणे, लहान मोठे टेकड्या, सपाट करून, झाडे झुडपे नष्ट करून, निसर्ग सौंदर्याचे वाटोळे करून, पर्यावरनाचा ऱ्हास करत, सर्वांच्या उघड्या डोळ्यासमोर जोरदार प्लॉटिंग व्यवसाय चालू आहे, तुकडा बंदी कायदा असताना, कायद्याची पळवाट शोधत, कुलमुखत्यार पत्राचा आधार घेत, जोरात व्यवहार चालू आहेत, कुलमुखत्यार पत्र बनवताना प्लॉट खरेदीदार, जोडण्यात आलेला सातबारा, किंवा त्यावरील लिटिगेशन याचा विचार करत नाही किंवा जाणून बुजून प्लॉट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला त्यापासून दूर ठेवले जाते, आणि त्याच्याकडून लाखोच्या पटीत रक्कम उकळली जाते, या व्यवहारानंतर काही महिन्यांनी संबंधित प्लॉटिंगच्या जमिनीचे वेगळे चित्र समोर येते, मग प्लॉट खरेदीदाराचे काय,? त्याच्या पैशाचे काय? अशा अनेक घटना घडलेल्या आहेत,
एकदा फसवणूक झाल्यानंतर तयार केलेल्या कुलमुखत्यार पत्राचा किती आधार मिळणार, अंधारात ठेवण्यात आलेल्या प्लॉट खरेदी धारकाने खरेदी प्लॉटवर बांधकाम केले असेल, आणि अतिक्रमण म्हणून त्याला ते बांधकाम पाडावे लागले तर, त्याच्या आयुष्याची कमाई पाण्यात गेल्यासारखी होईल, त्यामुळे प्लॉट खरेदी करताना अक्कल हुशारीने प्लॉट खरेदी करणे गरजेचे आहे, प्लॉटिंग व्यवसायिकाच्या डावपेचांना बळी पडू नये,