दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी (तालुका शिरूर) येथील नुकतीच नवनिर्वाचित उपसरपंच पल्लवी संदीप गारगोटे यांनी आपल्या कामाची सुरुवात दहिवडीतील दशक्रिया घाट येथे वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला व त्यांनी गावातील मोकळ्या जमिनीवरती सुंदर वेगवेगळ्या झाडांचे बन तयार करण्याचा संकल्प हाती घेतला,
गायरान जमिनी वरती ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी ज्या झाडापासून जास्त ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची म्हणजेच चिंच,वड,पिंपळ, कडुलिंब यांची झाडे अधिक वाढवण्याचा संकल्प केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे दहिवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला याप्रसंगी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष दौंडकर,माजी उपसरपंच मनीषा राजेंद्र ढमढेरे व वाल्मीक सातकर उपस्थित होते तसेच यावेळी माजी सरपंच आनंदराव गारगोटे, राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक अण्णासाहेब काळे सर,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, प्रकाश दौंडकर,नवनाथ दौंडकर,संतोष इथापे, उद्योजक विनय दौंडकर, वसंतराव ढमढेरे, फक्कडराव दौंडकर, कैलास गायकवाड, हर्षद गायकवाड, मयूर गायकवाड अविनाश गारगोटे,सिद्धार्थ गारगोटे तसेच महिला प्रतिनिधींची संख्या विलक्षण होती यामध्ये मीनाक्षी गायकवाड,अलका गारगोटे,स्वाती दौंडकर,स्वप्नाली गारगोटे, रुक्मिणी गारगोटे,शारदा गायकवाड,प्रतीक्षा पाचुंदकर, शालन इथापे, बाळूबाई गायकवाड,सुवर्णा गायकवाड आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.