सुनिल भंडारे पाटील
ऑनलाइन शिक्षणामुळे हाती मोबाईल येता त्याचा मुलांनी अति गैरवापर केल्याने कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान शैक्षणीक क्षेत्राचे व विद्यार्थ्यांचे झाले . पालक पुढारी पत्रकारांनीच मुलांना मोबाईलच्या चक्रव्युहातून वाचवावे , असे विचार पत्रकार मिडगुले यांनी वाफगाव (ता .खेड) येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात मांडले,
पालक म्हणतात रडाय लागल्याव आईनेच खेळणं म्हणून बाळाच्या हाती मोबाईल देवून घाण सवय लावली, शिक्षक सांगतात पालकांचा लाड , पुढारी म्हणतात आम्हाला राजकारणाचा लोड , पोरांकडे लक्ष द्याय वेळ नाय , पत्रकारांचे मते बातम्या न् जाहीराती टारगेट ओके केलं म्हणजे समाज्प्रबोधन झालं, व पत्रकारांचे थोर नेते बोलतात , आम्हीच मोबाईल मध्ये असतो तर नातवांना कसे रोकणार ? एकूण मोबाईलातीरेकाचा आगडोंब विझवायला चिमणीच्या शर्थीनेही प्रयत्न करायची कुणाची मानसीकता नाही . मोबाईलच्या प्रचंड गैरवापराने शहरी भागात १३ % मुलांची डोकी हँग झालीत व ९९% लोक हजारोंचे महीना बिल भरून हळूहळू भिकारी होताहेत याचं दुखः नाही ? ७-८ जण idea वापरून 'जियो ' अमिष दावून सर्रास लुटमार होतेय कुणाला खेद नाही . टीव्ही मोबाईलमुळे ५ वर्षाच्या मुलाला चष्मा लागतोय , मग त्या स्फुर्ती गिताप्रमाणे भारत बलसागर महासता कधी कसा होणार , असा प्रश्न मिडगुले यांनी उपस्थीत केला . मुख्याध्यापक तासगाव कर यांचे हस्ते हभप मिडगुले यांचा सत्कार करणेत आला.