लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
पुणे जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असा लौकीक असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागले होते.सरपंच पदी अपेक्षेप्रमाणे नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मोठ्या मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतुन असल्याने, चित्तरंजन गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कल्पना काळभोर यांचा पंचविसशेहुन अधिक मतांनी पराभव केला आहे.चित्तरंजन गायकवाड याना ७६२५ तर कल्पना काळभोर यांना ५१०५ मते मिळाली.
तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या सतरा पैकी तब्बल सोळांच्या जागांच्यावर दणदणीत विजय मिळवुन, चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. तर विरोधी जनसेवा पॅनेलला पॅनेल प्रमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर यांच्या रुपाने फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांची नावे (कंसात मिळालेल मते व विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे)
प्रभाग क्रमांक १ - नवपरीवर्तन पॅनल आकाश धनंजय काळभोर (१३८१ विजयी), स्मिता अंगदराव लोंढे (१३८५ विजयी ) व कोमल सुहास काळभोर (१५२ विजयी), विशाल विठ्ठल गुजर (१००२ पराभुत), नेहा बाबासाहेब चव्हाण (९५९ पराभुत), अर्चना हेमंत टिळेकर (८२९ पराभुत)
प्रभाग क्रमांक २ - नवपरिवर्तन पॅनल- बिना तुषार काळभोर (७८८ -विजयी), मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे(८२४ - विजयी), राजश्री उदय काळभोर (७१० - विजयी जनसेवा पॅनेल - रेश्मा नंदकुमार काळभोर (६१२), शीतल नितेश लोखंडे (६६४), स्मिता निलेश काळभोर (६८२)
प्रभाग क्रमांक ३ - नवपरिवर्तन पॅनल - दीपक अढाळे (६६९ - विजयी ), सुनंदा देविदास काळभोर (७०९- विजयी, जनसेवा पॅनेल शहाजी कांतिलाल मिसाळ (४२१), संगीता राजाराम दळवी (३९०)
प्रभाग क्रमांक ४ नवपरिवर्तन पॅनल रुपाली सतीश काळभोर (१०४५ - विजयी), नासीरखान मनुलाखान पठाण (९६२ - विजयी), अभिजित रामदास बडदे (९५९), जनसेवा पॅनेल - नंदू कैलास काळभोर (१०८५ - विजयी), बिस्मिला शमी शेख (७३३), दत्तात्रय भिमराव वाघमारे (६७४)
प्रभाग क्रमांक ५ नवपरिवर्तन पॅनल स्वप्नील शिवाजी कदम (१५१७ -विजयी), अविनाश विजय बडदे (१४९८- विजयी), सोनाबाई अशोक शिंदे (१४४६ - विजयी), जनसेवा पॅनेल स्मिता गुरुदत्त काळभोर (१३५४), मयूर सुरेश कदम (१३७०), अमित वसंत कदम (१२६२)
प्रभाग क्रमांक ६ - नवपरिवर्तन पॅनल योगेश भाऊराव मिसाळ (१८१६ - विजयी), सलीमा कलंदर पठाण (१८५१ विजयी), राणी प्रितम गायकवाड (१८९५- विजयी), जनसेवा पॅनेल श्रीकांत नारायण भिसे - (८२८), अर्चना श्रीकांत कदम (१२८६), मनीषा राजेश काळभोर (१२६१), स्वतंत्र रुपाली अविनाश कोरे - (४३०)