सुनील भंडारे पाटील
नुकत्याच तोंडावर आलेल्या पूर्व हवेली पट्ट्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जादूटोणा भानामतीचा प्रकार करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे,
पूर्व हवेली पट्ट्यातील कायम चर्चेत असणारे गाव, पेरणे या गावची ग्रामपंचायत निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, 18 तारखेला मतदार आपला हक्क बजावणार आहेत, या अनुषंगाने जनतेतून सरपंच पदासाठी पाच वार्डामधून सदस्य पदासाठी दोन पॅनल मधून तसेच अपक्ष उमेदवार समोरासमोर भिडलेले आहेत, प्रचाराची यंत्रणा जोरदार चालू आहे, त्यात आज या निवडणुकीत जादूटोणा, भानामतीचा प्रकार कोणीतरी गावात केला असून हा खळबळ जनक प्रकार आज सकाळी उघड झाला, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गावामध्ये जादूटोणा, भानामतीचा प्रकार करून राळे,उडीद, हळदी, कुंकू चौक रस्त्यावर तसेच काही उमेदवारांच्या घरासमोर टाकलेली आहेत, हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली,
पेरणे गावचे सरपंच रुपेश बापू ठोंबरे यांनी सांगितले की, आताचा समाज हा सुशिक्षित आहे, असल्या जादूटोणा, भानामती चा प्रकार वर लोक विश्वास ठेवणार नाहीत, लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये व्यवस्थित मतदान करावे,