सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील १ जानेवारी अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायतींना सुरक्षितता, शांतता, यासाठी दक्षता घेण्यात यावी यासाठी महत्वाच्या सूचना, आदेश जारी करण्यात आला असून तसे लेखी स्वरूपातील पत्र संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे,
१ जानेवारी २०१८ रोजी अभिवादन दिनाचे दिवशी कोरेगाव भीमा गावामध्ये सवर्ण - दलित वाद होऊन कोरेगाव भीमा व सणसवाडी या गावांमध्ये दंगल झालेली होती, याविषयी परस्परविरोधी गुन्हे दाखल असून सदर दंगलीमध्ये शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊन जीवित हानी झालेली होती, यापुढील काळात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी १ जानेवारी २०२३ रोजीचा कार्यक्रम होईपर्यंत फ्लेक्स, बॅनर, होल्डिंग, यासाठी परवानगी घ्यावी, त्यावरील मजकुराचे पोलीस स्टेशनला माहिती देणे, अक्षपार्ह मजकूर असू नये, पोलीस स्टेशनच्या परवानगीशिवाय कसलेही आंदोलन, उपोषण, निषेध मोर्चा, निषेध सभा, करू नये, अशा स्वरूपाचे कृत्य केल्यास तसेच दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीला पूर्णपणे जबाबदार धरून, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपात लेखी पत्र शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील ग्रामपंचायतींना दिले असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पो. कॉ. प्रफुल्ल सुतार यांनी सांगितले,