आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आज आळंदी देवाची येथे युवासेने च्या वतीने शहर कार्यकारिणी साठी शाखाधिकारी, उपशाखाधिकारी, वाहतूक सेना इ महत्वाच्या पदासाठी पदाधिकारी मुलाखत आयोजित केली होती.
यावेळी शहरप्रमुख मनोज पवार यांनी उपस्थित युवाकांना व युवतींना युवासेनेचे उद्दिष्ट, ध्येय धोरणे आळंदी शहर युवासेनेने आतापर्यंत केलेले कार्य याचा थोडक्यात आढावा दिला. उपशहर प्रमुख चारुदत्त रंधवे यांनी युवासेने तर्फे महाविद्यालयीन युवक व युवतींसाठी पुढे भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. उपशहर प्रमुख पै निखिल तापकीर यांनी उपस्थित युवकांचे प्रश्न समजावून घेऊन यापुढे युवकांचे प्रश्न सोडविण्यावर जास्तीतजास्त भर दिला जाईल असे यावेळी सांगितले. कृष्णा देशमुख यांनी पदवीधर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे महत्त्व व त्याची माहिती याबाबत सविस्तर माहिती युवकांना दिली.
जेष्ठ शिवसेना नेते मा नगरसेवक आनंदराव मुंगसे यांनी महाराष्ट्र व मराठी माणूस यासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षाची व भारतीय विद्यार्थी सेनेच्या कामाची माहिती युवकांना दिली. शिवसेना आळंदी उपशहरप्रमुख शशिराजे जाधव यांनी युवासेनेच्या कार्याला कायम पाठिंबा देण्याची ग्वाही यावेळी दिली.युवासेना आळंदी शहर समन्वयक अनिकेत डफळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन करून उपस्थित युवकांचे आभार मानले.
यावेळी युवासेना सचिव पै राहुल गोरे, शिवसेना उपशहर प्रमुख मंगेश तिताडे, शाखाप्रमुख पै श्रीपाद सुर्वे उपशाखा प्रमुख कृष्णा देशमुख, निलेश वाबळे, रवी धनवे , तुषार तापकीर, सौरभ झिंजुरके, योगेश पंडित, गणेश कदम, पै प्रद्युम्न भालेकर, संतोष रांजणे पै समीर सलाते यासह मोठ्या संख्येने युवक व युवती उपस्थित होते.