आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
धानोरे (ता खेड) पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत नेत्रची कीर्तन कोटक एज्युकेशन आणि यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी दिली, SCERT पुणे, कोटक एज्यूकेशन फाउंडेशन व व्हिजन स्प्रिंग यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे येथे दिनांक 20 ते 22 डिसेंबर 2022 या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 902 विद्यार्थी व 18 शिक्षकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 137 विद्यार्थ्यांमध्ये नेत्र दोष आढळून आले. या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे. 27 विद्यार्थ्यांमध्ये इतर गंभीर नेत्र दोष आढळून आले त्यांना पुढील उपचारासाठी नेत्र तज्ञाकडे पाठविण्यात आले.. सर्व सहयोगी संस्थांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ धानोरे यांचे वतीने मनःपूर्वक आभार. मानले आहेत