पीएमपीएलला प्रवाशांची गरज नसल्याचे उघड बस मोकळी असताना थांबवली नाही. प्रवाशी संतप्त

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
            लोणी काळभोर (तालुका हवेली) येथे पी एम पी एल बस चालक व कंडक्टर यांचा हलगर्जीपणा बस स्टॉपला बस न थांबवता निघून गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल,               पीएमपीएलच्या बस चालक व कंडक्टरने  रामदरा ते हडपसर ही बस रामदरा येथून लोणी गावात आली असता गावात १५ प्रवासी असताना सुद्धा बस थांबली नाही त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आज सायंकाळची घटना बस गावात सायंकाळी सात वाजुन वीस मिनिटांनी आली होती.याबाबत प्रवाशांनी सांगितले की बसचे चालक हे नेहमी असेच करताना दिसत आहे . बसमध्ये जागा असताना सुद्धा बस थांबवली नाही एका प्रवाशांना खिडकी वाजवली तरी बस चालक व कंडक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले व बस तशीच पुढे नेली पीएमपीएलला प्रवाशांची गरज नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगर पालिका परिवहन महामंडळाने या रूटवरील बस चालक व कंडक्टर यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच यापुढे प्रवासी उचलण्यासाठी त्यांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी लोणी काळभोर ग्रामस्थांनी केली आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!