लोणी काळभोर प्रतिनिधी
खडकवासला दहा नंबर गेट ते कुडजे या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सप्टेंबर 2021 रोजी झाले होते. त्यानंतर काम सुरु झाले, परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. अतिशय संस्थेगतीने काम सुरु आहे. तसेच ते निकृष्ट दर्जाचे आहे. रुंदीकरण सुरु असताना, पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याला खूपच खड्डे पडले आहेत. उखडलेल्या रस्त्याची खडी पसरल्यामुळे गाडी घसरून अनेक दुचाकी चालक अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. त्यात खडी क्रशर वाल्यांच्या संपामुळे पंधरा दिवस काम ठप्प होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सर्व पक्षीय आंदोलन केले. या आंदोलनात सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने महिला जिल्हा संघटिका अरुणाताई हरपळे आणि इतर महिला, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, वरिष्ठ नेते बबनराव भिलारे, मा. तालुका प्रमुख संदिप मते, उपतालुका प्रमुख संतोष दादा शेलार, तानाजी पवळे, उपविभाग प्रमुख अविनाश सरोदे, युवासेना समन्वयक सौरभ मोकाशी, मोहन गायकवाड, सुनिल पायगुडे, निखिल पायगुडे, अशोक पायगुडे, विजय तनपुरे, तुषार गायकवाड, राजू बाबर शिवाजी आप्पा ठाकर, राज महाले, विनोद मानकर, माऊली दिघे व इतर शिवसैनिक सहभागी झाले होते. शिवसेनेने या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. काही वेळा खड्डे भरून घेतले होते. Mseb चे पोल शिफ्टिंगचे इस्टीमेट मंजुरी साठी पाठपुरावा केला. कुडजे येथील धोकादायक पोल शिफ्ट करून उंच पोल उभे करून घेतले. अशी माहिती संतोष दादा शेलार आणि नितीन वाघ यांनी दिली. या आंदोलनात पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे, दत्ताभाऊ पायगुडे, जि. प. सदस्या अनिताताई इंगळे, मा. सभापती प्रभावती भूमकर,संगीता आठवले,मानसी सोनवणे, शुभांगी खिरीड, वंदना शेडे, संतोषी इंगळे,सचिन पायगुडे,अतुल आप्पा धावडे, युवराज वांजळे, रघुनाथ ठाकर, राजेंद्र जाधव, महेंद्र गायकवाड,गणेश तनपुरे, रोहिदास गोगावले, विकी मानकर, चंद्रकांत गोगावले, विश्वम्भर मांजरे, रमेश धावडे, सुधाकर गायकवाड, अमोल पायगुडे, राजू पायगुडे, राजेंद्र ढमढेरे, नवनाथ निढाळकर, मनोज पायगुडे, यशवंत तागुंदे, रवी पायगुडे, भिकोबा पायगुडे, गणेश पारगे, लक्ष्मण माताळे, नाना तनपुरे, रामभाऊ तुपे, रामभाऊ गायकवाड, महेश मांजरे, संजय तनपुरे, संदिप तनपुरे, आकाश ढेंबरे, आबा भूमकर हे उपस्थित होते. उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापूरकर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्रिंबक अण्णा मोकाशी, सुरेश तागुंदे, सरपंच सचिन पायगुडे,सरपंच रोहिदास गोगावले,अजित उर्फ काळू पायगुडे, नवनाथ तागुंदे, समीर पायगुडे,दिलीप पायगुडे,संतोष दादा शेलार यांनी पुढाकार घेतला.