अवसरी खुर्द प्रतिनिधी
संत रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त चर्मकार संघाच्या वतीने व अवसरी खुर्द- (ता-आंबेगाव - पुणे) ,चर्मकार समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
अवसरी खुर्द येथिल समाजाच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .महारांजाच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व महिला याच्या हस्ते पूजन व पुष्पहार घालण्यात आला या वेळी हरिभाऊ शंकर शिंदे (चेअरमन ) , हरिभाऊ मा.शिंदे, (मा.अध्यक्ष) , रामदास ज.शिंदे (चेअरमन), श्री रमेश शिंदे (मा.ग्रा .प.सदस्य), संतोष साबळे , बाळाराम शिंदे सर (क्रीडाधिकारी पि. चिंचवड), देविदास शिंदे , व सर्व तरुण पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या ,सागर शिंदे सर( उपाध्यक्ष- चर्मकार विकास महासंघ पुणे) याप्रसंगी बोलताना म्हणाले की ,
चौदाव्या शतकात कर्मकांड ,अंधश्रद्धा, अज्ञान ,भीती व गुलामगिरिणी जोखडलेल्या समाजाला संत रविदास महाराजांनी वाट दाखवली .निर्भीडपणे मानवतेचा संदेश देऊन ही क्रांतिकारी चळवळ अतिशय आत्मविश्वासाने रोहिदास महाराजांनी चालवली त्याचे विचार आज ही प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा देतात.माणसामधील द्वेष व भेदभाव नष्ट करण्याचे काम त्यांनी केले . समता व बंधु भावाची बीजे त्यांनी रोवली . तसेच बाळाराम सर (क्रीडाधिकारी- चिंचवड) यांनी आपले मनोगत व्यक्त करून केला