सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज राष्ट्रसेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये पुणे जिल्ह्याच्या सन २०२३ ते २०२५ साठी नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संमतीने जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी खालील प्रमाणे.
(१) विनोद गोरे (हवेली पश्चिम) - अध्यक्ष
(२) प्रसन्न कोतुळकर (पुणे कॅम्प) - कार्याध्यक्ष
(३) शिवाजी खांडेकर (पुणे) - कार्यवाह
(४) संगिता पाटील (आळंदी) - उपाध्यक्ष
(५) अशोक बाणे (पुरंदर) - उपाध्यक्ष
(६) अशोक भंडारे (सणसवाडी) - उपाध्यक्ष
(७) भगवंत चिताळकर (पिंपरी) - उपाध्यक्ष
(८) विकास दांगट (जुन्नर) - उपाध्यक्ष
(९) संतोष पुरोहित (भोर) - उपकार्यवाह
(१०) अरूणा ताम्हाणे (पाटस) - उपकार्यवाह
(११) संदीप कोल्हे (मंचर) - उपकार्यवाह
(१२) सुखदेव वाघ (अंथुर्णे) - उपकार्यवाह
(१३) उमेश ढोकणे (पुणे) - सेवक प्रतिनिधी
(१४) देवेंद्र पारखे (पुणे) - कोषाध्यक्ष
या जिल्हा कार्यकारिणी निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय कार्यवाह गोवर्धन पांडुळे, अध्यक्ष अनिल माने तसेच राज्य महामंडळाचे अंतर्गत हिशोबनिस संजय पाटील उपस्थित होते.
सभेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत व सांगली येथे होणाऱ्या राज्य महामंडळाच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाबाबत माहिती पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाहक शिवाजी खांडेकर सर्व उपस्थित शिक्षकेतरांना दिली. पुणे जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष सुखदेव कंद व कार्याध्यक्ष संजय धुमाळ यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत केले व काही नवीन - काही जुनेजाणते अशी ही सुंदर पदाधिकारी निवड झाली असुन पुढील काळात एकजुटीने तसेच अधिक जोमाने जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कामकाज चालेल व भविष्यात स्थानिक तसेच राज्य पातळीवरील शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सुटतील असा आशावाद व्यक्त केला.