लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
खडकवासला धरणातून आज पहाटे १००५ क्युसेसने नवीन मुळामुठा कालवा नवीन कॅनाॅलला शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. पाणी जास्त प्रमाणात असल्याने फुरसूंगी देशमुखमळा येथील जागेतून जाणाऱ्या कॅनोलला कॅनाॅलचे रस्त्याखालून मोठी घळ म्हणजेच बोगदा पडून कॅनाॅल फुटला होता.
थोडा वेळ गेला असता तर संपूर्ण भराव वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. पाटबंधारे खात्याला याची पुसटशीही कल्पना नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असताना पाटबंधारे खात्याचे कोणतेही आधिकारी , कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी न करताच पाणी सोडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वास्तविक पाहता पाणी सोडण्याअगोदर पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांनी पाहणी करून तसेच सोडलेल्या पाण्याला काही अडथळा निर्माण होतो का हे पाहणे आवश्यक असताना याबाबत कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचेच नागरीकां मधून बोलले जात आहे. फुरसुंगी देशमुख मळा येथील नवीन कालवा आज पहाटे फुटला असल्याचे स्थानिक शेतकरी बाळासाहेब देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर महेश चोरघडे यांनी सदर बाब ग्रामस्थांना कळविल्यानंतर स्थानिक विशाल नाना हरपळे विलास कामठे महेश चोरघडे यांच्या जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने कालवा बुजवायचे काम करण्यात आले ग्रामस्थांचे जागरूकतेने मोठी हानी टळली.ग्रामस्थांनी फोनवर माहिती दिल्यावर पाटबंधारे खात्याला जाग आली.संसदेचे हिवाळी आधिवेशन सुरू आहे. लोकप्रतिनिधी अधिवेशनासाठी नागपूर येथे गेलेले असताना जर काही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण अशा प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केल्या. भाऊसाहेब हरपळे व कांताराम सुपे हे उपस्थित होते तसेच सिंचन विभागाचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी शिंदे साहेब तसेच अभियंता जोशी मॅडम यांना धनंजय कामठे व गोरख भाऊ कामठे यांनी संपर्क करून कालवा बंद करून पाटबंधारे खात्याचे अधिकारी व यंत्रसामग्री पाठवण्यास सांगितली यावेळी काका खराडे, नाना चोरघडे, प्रकाश देशमुख, गणेश ढोरे, नवल काका देशमुख, प्रदीप पवार, सोमनाथ पवार, नितीन हरपळे, मच्छिंद्र पाटील, शिवराम चोरघडे ,रवींद्र कड, अमोल कामठे, जीवन पवार ,नाना चोरघडे जीवन कामठे, प्रीतम देशमुख, अनिकेत चंद, भाऊसाहेब हरपळे फुरसुंगी ग्रामस्थ उपस्थित होते.पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता जगताप मॅडम, जोशी मॅडम कार्यकारी अभियंता विजय पाटील साहेब यांनी भेट दिली.
याबाबत मोहन भदाने उप अभियंता पाटबंधारे विभाग याना फोनवरून विचारले असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले.
पल्लवी जोशी कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग यांनी सांगितले की कालव्याला घळ पडला होता माहिती मिळताच आम्ही जागेवर जाऊन पाणी बंद करून मशिनरी उपलब्ध करुन बुजविण्याचे काम सुरू आहे. लवकरच पुर्ण करुन पाणी सोडले जाईल.