शिरूर प्रतिनिधी
आगामी कोरेगाव भिमा शौर्य दिन २०२३ चे तसेच प्रतिबंधक कारवाईचे अनुशंगाने पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणुन मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे .
त्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांचे सातत्याने संपर्कात राहिल्याने दि . २५/१२/२०२२ रोजी १६:०० वा . चे सुमारास पोसई पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली कि इसम स्वप्नील शंकर कुरदंळे हा बाबुरावनगर विश्व विजय हाईटस येथील त्याचे ऑफिसमध्ये त्याचे सोबत बेकायदेशिर विनापरवाना गावठी पिस्तुल जवळ बाळगुन बसलेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने पो . नि सुरेशकुमार राउत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीस पिस्तुलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस पथकातील पोसई पाटील पो हवा सुद्रिक , पो . ना . जगताप , पो . कॉ हाळनोर , पो कॉ थोरात यांना बातमी मिळाल्या ठिकाणी पाठविले असता तेथे स्वप्नील शंकर कुरदंळे वय ३१ वर्षे रा .विश्व विजय हाईटस बाबुरावनगर शिरूर ता . शिरूर जि.पुणे हा तेथे संशयास्पद मिळुन आला, त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ३०,००० / - रू किंमतीचे एक गावठी पिस्तुल १००० / - रू किंमतीचे पाच जिवंत काडतुस असा एकुण ३१००० / - रू किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करण्यात आलेला आहे . तसेच आरोपीस देखील अटक करण्यात आलेली असुन अटक आरोपीकडे गुन्हयाचा अधिक तपास केला असता त्याने ते पिस्तुल हे अरबाज रहिम शेख वय २१ वर्षे रा . सय्यदबाबानगर दर्ग्याजवळ शिरूर ता . शिरूर जि.पुणे याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितलेले असुन त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ८५२ / २०२२ आर्म्स अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोसई एकनाथ पाटील हे करीत आहेत . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल मा . अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गटटे पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशंवत गवारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली मा . पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत,शिरूर पोलीस स्टेशन , पोसई एकनाथ पाटील , पो हवा सुद्रिक , पो.ना. जगताप , पो . कॉ . हाळनोर , पो.कॉ. थोरात यांनी केलेली आहे .