सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) १ जानेवारी मानवंदना दिन शांततेत व सुरळीत पार पडला.रात्री १२ वाजून १ मिनिटांनी विजय स्तंभ भोवती फटाके फोडून २०५ व्या शौर्य दिनाच्या उत्सवास जल्लोषात शुरुवात झाली.
सकाळी पहाटेच ४ वाजल्या पासून भीम अनुयायी विजय स्थंभास अभिवादन करण्यासाठी सज्ज झाले.दुपार नंतर भीम अनुयायांची संख्या झपाट्याने वाढत गेली.दर वर्षाच्या तुलनेने यंदा भीम अनुयायांची संख्या दुप्पट पटीने जास्त असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला,गर्दीच्या लाटेमध्ये अनेक लहान मुले हरवल्याची घटना या वेळी पाहण्यास मिळाली.परंतु पोलिसांच्या सतर्कतेमळे कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही.वेळोवेळी पोलिसांची मदत व सरकारने केलेल्या नियोजनामुळे भीम अनुयायांना अभिवादन करण्यास जास्त अडचणींना सामोरे जावे लागले नाही.
रणस्थंब परिसरात एवढी गर्दी झाली होती की,कुठेही उभे राहण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिली नव्हती तर पुणे नगर संपूर्ण रस्ता देखील पायी चालणाऱ्या भीम अनुयायांच्या लाटेने दिसेनासा झाला होता.
ठिकठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते.अनेक मान्यवरांनी या शिबिरास भेट देत रक्तदान केले.पोलिसांनी निभविलेल्या कर्तव्यदक्ष व उत्तम कामगिरीमुळे शौर्य दीन शांततेत व सुरळीत पार पडला.
सकाळ पासून अनेक मान्यवरांनी विजय रणस्थंबास अभिवादन करून गेले.वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, यांनी अभिवादन केले, राज्य शासन तसेच पोलीस खात्याच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले होते, प्रवासी वाहतूक व्यवस्था, रणस्तंभ परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली होती, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, अल्पोपहार, व इतर सोयी सुविधा शासनाच्या वतीने देण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले, त्याचप्रमाणे पोलीस खात्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, शासन व पोलीस खाते यांचे चांगले नियोजन असल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले, असेच नियोजन दरवर्षी करावे अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली,