सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनामध्ये शेवटचे ४० दिवस खूप महत्त्वाचे आहेत, बलिदान मासा मधील प्रत्येक दिवस, धर्म बदलण्यासाठी शंभूराजांना विचारले जात होते, राजांनी नाही म्हटल्यानंतर अतिशय तीव्र मरण यातना सोसून शंभूराजांनी अखेर धर्मासाठी मृत्यूला कवटाळले म्हणून "धर्मवीर"
धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर शंभूराजांच्या वढू - तुळापूर समाधीस्थळावर नतमस्तक होताना धर्मवीर शंभूराजांच्या बलिदानाची आठवण प्रत्येक शंभू भक्ताला येते, गणोजी शिर्के च्या फितुरीने खूप मोठे नुकसान स्वराज्याला झाले, शंभूराजांना पकडल्यानंतर ४० दिवस मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी क्रूरकर्मा औरंग्याने प्रयत्न केले, शंभुराजे आणि कवी कलश यांना रोज विचारले जायचे मुसलमान धर्म स्वीकारणार, परंतु त्यांच्याकडून फक्त एकच उत्तर यायचे, "तुझा धर्म जसा तुला प्यारा, तसाच माझा धर्म मला प्यारा, धर्मासाठी प्राण पणाला लावणार परंतु मुसलमान धर्म कधीच स्वीकारणार नाही" असे उत्तर शंभूराजे, कवी कलश यांच्या तोंडून यायचे, आणि अखेर त्यांना पकडल्यानंतर ४० दिवसातील प्रत्येक दिवस मरण यातना सहन करत, अखेर वढू- तुळापूर या ठिकाणी भीमा भामा इंद्रायणी च्या त्रिवेणी संगमावर शंभुराजे आणि कवी कलश यांची प्राणज्योत मालवली, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या शंभूराजांची ख्याती सर्व जगाला माहिती आहे, म्हणून शंभूराजांना "धर्मवीर" या उपाधीने राज्य, हिंदुस्तान, तसेच सर्व जगामध्ये ओळखले जाते,