आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी शहराला भामा आसखेड केंद्रातून शुद्ध पाणीपुरवठा होत असतो गुरुवार दिनांक 19 1 2023 रोजी भामा आसखेड केंद्र येथे देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा यंत्रणा बंद राहणार असून, त्यामुळे संपूर्ण पुणे शहर तसेच आळंदी शहराला पाणीपुरवठा होणार नाही.
अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. शुक्रवार दिनांक 20/1/ 2023 रोजी नेहमीप्रमाणे परंतु उशिरा कमी दाबाने आळंदी गावठाण, देहू फाटा भागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे एका पत्रकाद्वारे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जाहीर केले आहे, नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचा अपव्याय टाळत पाणी जपून वापरावे.तसेच नागरिकांनी या सूचनाची दखल घ्यावी अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दिली आहे,