"धर्मवीर शंभूराजे" राज्याभिषेक सोहळा उत्साहात- तुळापुरात "धर्मवीर" जयघोष

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
      धर्मवीर संभाजी महाराज की जय.. हर हर महादेव...  अशा गगनभेदी घोषणा देत उत्साहपुर्ण विधीवत पुजा आभिषेक करुन आज श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचा  343 वा राज्यभिषेक दिन उत्साहानं साजरा करण्यात आला. 
 सकाळी संगमेश्वर अभिषेक छ. संभाजी महाराज , कवी कलश याची समाधी पुजा अभिषेक , आमदार अशोक (बापू) पवार आणि  मोजक्या  शंभूभक्त कार्यकर्त्यांनी विधीवत अभिषेक पुजा केली. छ. संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व गावातील मिरवणूक मार्गावर पालखी मिरवणूक झाली यावेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या 
   आमदार अशोक पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप कंद, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश कुटे,  सरपंच गुंफाताई इंगळे, उपसरपंच राजाराम शिवले, माजी सरपंच रंगनाथ शिवले, जयवंत शिवले, ज्ञानेश्वर शिवले, रुपेश शिवले, लोचन शिवले, नवनाथ शिवले, अमोल शिवले, पवन खैरे, राजाराम शिवले, सचिन सातपुते, संतोष बारणे आदी सह मोठ्या संख्येने शंभूभक्त ग्रामस्थ उपस्थित होते,
 यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य भुमी आहे प्रेरणा स्थान आहे. आमचं दैवत आहे म्हणून या स्थळांच्या विकासासाठी प्राधान्य आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकास आराखडा तयार केला आहे. आघाडी सरकारने 270 कोटी मंजूर केले होते. शिंदे सरकारने 290 केले आहे पण ते लवकरच मंजुरी होऊन काम लवकर सुरु करावे अशी आमची मागणी आहे.
   या मुळे गावच रुप पालटणार आहे. राज्यातील शंभू भक्तांची सोय होणार आहे. तसेच येथील गायरान जमिनीवर सुसज्ज रुग्णालय उभे करावे, लोणीकंद - आळंदी रस्ता, तुळापुर आपटी पुल हि कामे हि विचारधिन आहे
   माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले स्वागत करुन म्हणाले तुळापुर कडे येणारा मुख्य रस्ता चार पदरी सिमेंट क्राक्रीटकरण व्हावे, वाघोली भावडी रस्ता, मरकळ पुल आदी कामे प्राधान्याने व्हावी अशी त्यानी मागणी केली.
 छ. संभाजी महाराज स्पुर्थी स्थळ परिसर स्वच्छता करण्यात आली होती चोहुकडे पुतळ्यास आकर्षक फुलाची सजावट रण्यात आली होती. त्यावर मध्यभागी " धर्मवीर " नाव कोरण्यात आले होते ते लक्ष वेधून घेत होते.
लेझीम पथक, मर्दानी खेळ आणि शाहिरी पोवाडा कार्यक्रम झाले.आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती 
लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन पवार व सहकार्यानी चोख बंदोबस्त ठेवला होता. संतोष शिवले यांनी सुत्रसंचालन तर शिवाजी शिवले यांनी उपस्थिताचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!