आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील नवीन मुख्याधिकारी नियुक्तीचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे अंकुश जाधव यांना बढती मिळाल्यानंतर कैलास केंद्रे यांना मुख्याधिकारी म्हणून शासकीय नियुक्त पत्र मिळाल्या त्यांच्या नवीन नियुक्ती बद्दल आळंदी नगरपरिषद चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुराडे शिक्षण मंडळ माजी सभापती श्रीधर कुराडे पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे प्रतिनिधी प्रकाश कुऱ्हाडे आळंदीचे माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे आदी ग्रामस्थ यांनी मिळून त्यांचा नगरपरिषद कार्यालयात सत्कार केला आहे,
यावेळी मोठ्या प्रमाणात मागणी असलेली ऐंशी फुटी बाह्य मार्ग वळण रस्ता याकडे या सन्माननीय नागरिकांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्ष वेधले तसेच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टाळण्यासाठी देहू फाटा ते बोलाई मंदिर येथे 80 फूट बाह्यमार्ग रस्ता करून त्यावर नवीन पूल बांधला गेला पाहिजे त्यासाठी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मार्फत मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही या सत्कार प्रसंगी दिलेले आहे एकूणच विलास केंद्रे मुख्याधिकारी पदी नियुक्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांची सत्कार हे ग्रामस्थांच्या युवकांच्या माध्यमातून केले जात आहेत आणि त्यांच्याकडे अंकुश जाधव यांनी केलेल्या कामाची पावती असताना देखील भविष्यातील आणखीन सुधारित कामे होण्यासाठी मोठ्या आशेने नागरिक पाहत आहेत दरम्यान भविष्य काळामध्ये वरील मान्यवरांनी शासकीय निधी आणून मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना सत्कार करत ग्वाही दिली आहे,