सुनील भंडारे पाटील
भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (ता हवेली) येथे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले,
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अजित पवार यांनी चुकीचे वक्तव्य केल्याने तमाम हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असून, राज्यभरात अनेक ठिकाणी निषेध आंदोलने चालू आहेत, हवेली तालुक्यामध्ये आपला निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पार्टी तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे समाधी स्थळ तुळापूर ग्रामस्थ, तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन छेडण्यात आले,
यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे, संघटन सरचिटणीस संदीप सातव,गणेश कुटे, सुदर्शन चौधरी,प्रवीण काळाभोर,श्याम गावडे,जयश शिंदे,अमोल शिवले,केतन जाधव,पूनम चौधरी यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली,अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन तमाम शंभू भक्तांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली,