रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कारेगाव (ता. शिरुर) येथील सरंपच निर्मला शुभम नवले व ग्रामपंचायत सदस्या प्रियंका संदीप गवारे यांना गायरान जागेत अतिक्रमण केल्या प्रकरणी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदा साठी अपाञ केले असल्याचे पञ जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिले आहे.
जानेवारी २०२१ साली झालेल्या कारेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केला होता. माञ निर्मला शुभम नवले व प्रियंका संदीप गवारे यांनी गायरान जागेत अतिक्रमण करुन घरे बांधून राहत असल्यामुळे व ग्रामपंचायत निवडणुक लढवल्यामुळे व या बाबत कारेगाव चे माजी सरपंच अनिल उर्फ किसन नवले व भारत आबा नवले यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे या अतिक्रमणाबाबत तक्रार केल्यामुळे या दोन सदस्यांना अपाञ करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी दिले आहे. सदर आदेश ३० डिसेंबर २०२२ रोजी पारित करण्यात आला आहे,