सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील अल अमीम एज्युकेशन सोसायटीमध्ये रस्ता वाहतूक सप्ताहाचे अंतर्गत कार्यक्रमात नुकताच घेण्यात आला,
सद्यस्थितीत वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहन चालक यांना शिस्त लावण्याची गरज आहे, बेशिस्त वाहन चालकांमुळे रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, कित्येकांना तर अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे, हे थांबवण्यासाठी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे, प्रादेशिक अधिकारी पुणे डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी पुणे संजीव भोर यांच्या मार्गदर्शना खाली जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.
यावेळी सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक जयंत काटे, श्रद्धा कंदाकुरे,वाहन चालक सुभाष मंडलिक, सीईओ अल अमीन सोसायटी अमीर
इनामदार, गव्हाणे मोटर्स चे राजेंद्र गव्हाणे, फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश खैरमोडे, विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अलाबक्ष्य शेख, ग्लोरी कनिष्ठ महाविद्यालयीचे प्राचार्य अनिल मिश्रा,उद्योजक विकी गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.संदीप मुरकुटे पुढे म्हणाले की, दरवर्षी देशात रस्ते अपघातात 1लाख 60 हजार ते 1 लाख 75 हजार मरण पावतात. यातील अनेक 18 ते 22 वयोगटातील तरुण असतात. कोरोना मध्ये दर कमी होता.यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची वाहने चालवीत असताना उपयोगात येणाऱ्या चिन्हांची माहिती देण्यात आली. तसेच मुलांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.