सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील भीमा नदीवरील बंधार्यावर काल रात्री 1.1.2023 रविवारी 7:30 वाजता बिबट्याचे दर्शन झाले, गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचे अस्तित्व आहे,
वढु बुद्रुक आणि वढू खुर्द या गावांना जोडणाऱ्या या भीमा नदीवरील बंधाऱ्यावर काल रात्री बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले असून, बिबट्या वढू बुद्रुक च्या बाजूने वढू खुर्द च्या बाजूला बंधाऱ्यावरून चालत जाताना दिसला, एका चार चाकी गाडीच्या समोर बिबट्या निर्धास्तपणे चालला आहे, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून,या भागात नदीच्या दोन्ही बाजूला दाट झाडे झुडपे आहेत, तसेच दोन्ही बाजूला मोठे ऊस बागायत क्षेत्र आहे, गेल्या आठवड्यात दैनिक भरारीचे संपादक पत्रकार सुनील भंडारे पाटील, तसेच मलाव वस्तीवरील पोपट मलाव यांच्या दोन दुचाकी च्या मधून कोरेगाव भीमा वढु रस्त्यावर बिबट्या दर्शन देऊन गेला होता, त्याची बातमी देखील प्रसिद्ध झाली होती, शिवाय ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी देखील केली होती, सुस्त असणाऱ्या वनखात्याने, तसेच शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे,
काल पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून, शिरूर वनखात्याने तातडीने या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा, मोठी घटना घडण्याची वाट पाहू नये अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत,