अजित दादांच्या वक्तव्याचा वढू बुद्रुक येथे तीव्र निषेध- अजित दादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीवर लोटांगण घेऊन माफी मागावी ग्रामस्थांची भूमिका

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
               अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी चुकीचे विधान केल्याने राज्यातील तसेच देशातील जनतेच्या भावना दुखावल्या असून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढु बुद्रुक येथे ग्रामस्थ व शंभू भक्तांच्या वतीने तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला,           
    नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये अजित दादा पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच असे बेताल व्यक्तव्य करून तमाम महाराष्ट्राच्या असंख्य शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, शंभूराजे धर्म रक्षणासाठी जगले व हिंदू धर्म रक्षणासाठीच प्राणाचे बलिदान केले, हे त्यांनी विसरता कामा नये, त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण अध्ययन केलेले नाही यावरून त्यांची प्रचिती येते, त्यांनी सर्व मराठी माणसांचा अपमान केला आहे, त्याबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे तीव्र स्वरूपाचा निषेध करण्यात आला, शिवाय अजितदादा यांनी समाधीस्थळी येऊन लोटांगण घेऊन माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली, तसेच शंभूराजांचा पुण्यतिथीचा दिन हा धर्मवीर बलिदान दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, यावेळी बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ, शंभू भक्त उपस्थित होते, याप्रसंगी अनेकदा निषेध निषेध निषेध अशा घोषणा देण्यात आल्या,   
        यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शंभू भक्त बबन दरगुडे, नामदेव पोटावडे, गुंडाभाऊ भंडारे, साधना गोलांडे, सुनिता भंडारे, उर्मिला भंडारे, कौशल्य यशवंत,अंजना भंडारे, नीता भंडारे, साधना भंडारे, शकुंतला चव्हाण, मंगल गाजरे, कल्पना नाणेकर, वनिता भंडारे, भामाबाई शिवले, बेबी भंडारे, सोनाली भंडारे, निर्मला भंडारे, सुनिता भोसले, संगीता आरगडे,अक्षता मोरे, रूपाली भंडारे, स्वाती भंडारे, नीलिमा देशमुख, पल्लवी रणदिवे, भिमाबाई भंडारे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या,
           अजित दादा पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र स्वरूपाचा निषेध करून यापुढे कुठलेही लोकनेत्यांनी छत्रपतींवर बोलू नये, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, या पुढे अशा स्वरूपाचे प्रकार घडले नाही पाहिजेत, दादांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सिद्ध करून दाखवावी आम्ही त्यांची पाठ थोपटू, नाहीतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी वर लोटांगण घेऊन जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे वक्तव्य  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, साधना गोलांडे,कौसल्या यशवंत, सुनिता भंडारे,यांनी प्रखर शब्दात व्यक्त केले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!