सुनील भंडारे पाटील
पूर्व हवेली पट्ट्यातील केसनंद पासून वाडेबोल्हाई या गावांमध्ये राहु रोडच्या दक्षिण बाजूला अनेक प्लॉटिंग व्यवसायिकांनी प्लॉटिंगला जाणारे रस्ते राजरोसपणे गायरानातून काढले असून, प्लॉट खरेदीदाराची भविष्यात मोठी फसवणूक होण्याची शक्यता,
या भागामध्ये पावलोपावली अवैध प्लॉटिंग व्यवसायांचा सुळसुळाट झाला असून, शेती झोन असणाऱ्या जमिनीची प्लॉटिंग व्यवसायिकांनी पूर्णपणे चाळण केली आहे, शिवाय या भागातील निसर्ग सौंदर्य धोक्यात आले आहे, राहु रोडच्या उत्तर बाजूला अतिशय सुंदर अशी डोंगररांग आहे, डोंगराच्या उशाला डोंगर कोरण्यापर्यंत प्लॉटिंग व्यवसायिकांची मजल गेली आहे, त्याचप्रमाणे राहु रोडच्या दक्षिण बाजूला शेकडो एकर गायरान जमीन आहे, या गायरान जमिनीतून संबंधित प्लॉटिंग व्यावसायिकांनी प्लॉटला जाण्यासाठी अनधिकृत रस्ते काढले आहेत, भविष्यात जर हे रस्ते बंद झाले तर, खरेदीदाराने आपल्या प्लॉटवर जायचे कसे असा गंभीर प्रश्न तयार होणार असल्याने, आता चोखंदळ ग्राहकाने या सर्व बाबींची चौकशी करूनच निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशा स्वरूपाच्या फसवणुकिच्या अनेक घटना घडलेल्या असून, न्याय मागण्यासाठी कित्येक प्रकरणे न्यायालयात तसेच शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्यामुळे आपण जो प्लॉट घेतोय त्या प्लॉटला जाण्यासाठी स्वतःचा हक्काचा रस्ता आहे की नाही याची देखील शहानिशा करणे गरजेचे आहे,